breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आता नगरपालिकेच्या शेती झोनमध्ये शैक्षणिक, मेडिकल संस्था

पुणे- नगरपालिका हद्दीतील शेती अथवा शेती ना विकास या झोनमध्ये आता शैक्षणिक आणि मेडिकल संस्था उभारता येणार आहेत. यासाठी कमीत-कमी सुमारे एक एकर जागा असणे आवश्‍यक असून या जागेवर जास्तीत जास्त 0.30 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरता येणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना पायपीट करत शहरात येण्याची गरज भासणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे नगरपालिकेच्या हद्दीतच आता शैक्षणिक अथवा मेडिकल संस्था उभारणे सोपे होणार आहे.

नगरपालिका अथवा नगरपरिषदांच्या हद्दीतही वेगाने नागरीकरण होत आहे. तसेच गावेही आता मोठी झाली आहेत. त्यामुळे काही मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे रुपातंतरण नगरपालिकांमध्ये झाले आहे. नागरिकीकरण झाले असल्याने या ठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि मेडिकल संस्थांची आवश्‍यकता आहे. शेती आणि शेती ना विकास या झोनमध्ये बांधकाम करण्यास मर्यादा येतात. यासर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने नगरपालिकेच्या हद्दीतील शेती आणि शेती ना विकास या झोनमध्ये शैक्षणिक किंवा मेडिकल संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने यावर नागरिकांच्या हरकती अथवा सूचना मागविल्या आहेत. शेती अथवा शेती ना विकास या झोनमध्ये शैक्षणिक आणि वैद्यकिय वापरास परवानगी देताना शासनाने काही नियम घातले आहेत.

असे आहेत नवीन नियम
शैक्षणिक आणि वैद्यकिय कारणांसाठी जागेचा वापर करायाचा असेल, तर कमीत कमी क्षेत्र हे एक एकर असावे. या जागेवर जास्तीत जास्त 0.30 इतका एफएसआय वापरास परवानगी असणार आहे. तसेच प्रति हेक्‍टर जागेवर 500 झाडे लावणे आवश्‍यक आहे. तसेच इमारतीची उंची ही 15 मीटरपेक्षा जास्त नसावी. संबधित जागेवर जाण्यासाठी 12 मीटर रुंदीपेक्षा कमी रस्ता नसावा, असे नियम आखले आहेत. यावर नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या नोंदविता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button