breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

मुंबई |

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुचाल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री विशाखा सुभेदारने फेसबुकवर याविषयी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशाखाने आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, सहकलाकारांचे आणि परिवाराचे आभार मानले आहेत. तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, म्हणूनच मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा प्रयत्न करते, असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर या पुरस्काराबद्दल कळल्यावर आपल्या परिवाराची प्रतिक्रियाही तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितली आहे. ती म्हणते, “आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य, “आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पाहिलं आणि भरून आलं”.

“नवरा फोनवरून सतत संपर्कात तोही जाम खूश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड,सगळ्या- सगळ्यांचे कौतुकाचे फोन, मेसेज, मित्र मैत्रिणींचे फोन, शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झाला आहे”. पुण्यातल्या सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असं सांगताना स्त्रीशक्ती अद्भुत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात सांगितले. माणूस कितीही यशस्वी झाला तरीही सुख-दुःखाच्या प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असंही राज्यपालांनी सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सूर्यदत्ता समूहाच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनादेखील सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button