मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल
मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात जात असतात. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे आज रिलायन्स रूग्णालयात दाखल झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्याने शिवसैनिक व कार्यकर्त्यांना चिंता लागली होती. त्यातच उद्धव ठाकरे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.