breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंब्रिज स्कूल मध्ये भरला कृष्ण जन्माष्टमी चा रंग

  • सर्व विद्यार्थी व पालक दहीहंडीच्या भक्तिरसात दंग 

पिंपरी – परमात्मा श्रीकृष्णजन्मोत्सवाचे औचित्य साधून, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी सोहळा अतिशय भाव भक्तिमय वातावरणात साजरा झाला.शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. डॉक्टर धनंजय वर्णेकर, सचिव ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री.राम रैना, संचालिका सौ शितलताई वर्णेकर ,विश्वस्त सौ राजश्रीताई काळभोर, उपप्राचार्या सरब्जित कौर, वैश्विक स्कूलचे श्री शिव गीर, यांच्या उपस्थितीत बाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली.

शाळेचे विद्यार्थी परीक्षित राठोड-व्हायोलिन,ओम कदम-सिंथेसायझर, वैष्णवी नेवे-हार्मोनियम, मृण्मयी पंगणुरवार-भरतनाट्यम, प्रिशा अग्रवाल-भक्ती नृत्य यांद्वारे सुरेल व भावमय कृष्ण भजन भक्ती गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची आराधना करणारे नृत्य सादर केले.

मधापेक्षा गोड आणि अमृताहुनी श्रेष्ठ अशा या गोपाळकाला उत्सवात शाळेच्या मुला-मुलींच्या दहीहंडी पथकाने जल्लोषात पण सुरक्षितपणे पारंपारिक दहीहंडी फोडली.पवित्र अशा गोपाळकाला प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कोरोना सारख्या आजारामुळे सर्वत्र दुःखाचे सावट असताना शाळेने व विद्यार्थ्यांनी सर्वांच्या मनावर आनंदाचे व भक्तीचे करून नवचैतन्याची पालवी फुलवल्याचे मत शाळा व्यवस्थापन व पालकांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरक्षित व यशस्वीपणे आयोजन शाळेच्या इवेंट कमिटीने, तर शिक्षिका सौ विभा दवे, सौ अपेक्षा कुलकर्णी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button