breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे – शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले. आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत दि. 20 जूनपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहितीपुस्तिका वाचून ऑनलाईन अर्ज भरावेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली.

ऑनालाईन अर्ज केल्यानंतर शुल्क भरून कन्फर्म करावेत. अर्धवट अर्ज प्रवेश फेरीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यात दुरुस्त करण्याची सुविधा आहे. परंतु ती दि. 20 जूनपर्यंत राहणार आहे. मूळ कागदपत्रांची तपासणी राज्यातील लगतच्या आयटीआयमध्ये करून घेणे. विद्यार्थ्यानी अर्ज भरताना मोबाईल क्रमांक व्यवस्थितपणे नमूद करावा. कारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होताच, त्याच मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तुमचे प्रवेश कळविले जाणार आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आयटीआय प्रवेश वेळापत्रक
* ऑनलाईन अर्ज करणे : 1 ते 20 जून
* प्रवेश अर्ज कन्फर्म करणे : 4 ते 21 जून
* पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : 4 ते 22 जून
* प्राथमिक गुणवत्ता यादी : 25 जून रोजी सकाळी 11
* गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : 25 ते 26 जून
* अंतिम गुणवत्ता यादी : 28 जून रोजी सायं. 5 वाजता
* पहिली प्रवेश फेरी : 3 जुलै ते 6 जुलै
* दुसरी प्रवेश फेरी : 13 ते 17 जुलै
* तिसरी प्रवेश फेरी : 25 ते 28 जुलै
* चौथी प्रवेश फेरी : 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट

प्रवेश अर्ज शुल्क :
खुला गट : 150 रुपये
राखीव प्रवर्ग : 100 रुपये
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ :
http://admission.dvet.gov.in

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button