ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपुरात डिझेलपेक्षा सीएनजी महाग; प्रतिकिलो १२० रुपयांवर

नागपूर|  पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी सीएनजी गाड्यांना पसंती दर्शवली. मात्र पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाडी घेतलेल्यांना आता मोठा फटका बसला आहे. पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यातच सध्या देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतंय. नागपुरात प्रतिकिलो सीएनजीसाठी तब्बल १२० रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी नवीन सीएनजी गाड्या खरेदी केलेल्या अनेकांना आपण चूक केली की काय, असे वाटत आहे.

दोन दिवसांपूर्वी १०० रुपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. नागपूरमध्ये सीएनजी पाईपलाईन नसल्याने सरकारी सबसिडी मिळत नाहीये, त्याचा थेट परिणाम सीएनजीच्या किंमतीवर झाला आहे. शिवाय नागपुरात सीएनजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून गुजरातमधून एलएनजी आणून नागपूरमध्ये सीएनजीत रुपांतर करण्याचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे देशात सर्वात महाग सीएनजी सध्या नागपूरमध्ये मिळत आहे. रस्ते मार्गाने एलएनजी आणून त्याचे रुपांतर सीएनजीमध्ये करण्याचा खर्च भरपूर आहे. परिणामी नागपूरमध्ये सीएनजीच्या दराने उच्चांक गाठला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button