पिंपरी / चिंचवड

देहूरोडमध्ये कपड्यांचे दुकान फोडले : पिंपरीत घर फोडले

पिंपरी l प्रतिनिधी

देहूरोड बाजारात असलेले फॅशन पॉईंट नावाचे कपड्यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातून रोख रक्कम आणि कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली आहे.

साहिल मोहम्मद शेख (वय 37, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे देहूरोड बाजारात कपड्यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडून दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेली आठ हजार 440 रुपये रोख रक्कम, दुकानातील शर्ट, जीन्स पॅन्ट, परफ्युम असा एकूण 62 हजार 440 रुपयांचा माल चोरून नेला.

कामगारनगर पिंपरी येथे घरफोडी

कामगारनगर पिंपरी येथे एक घरफोडी झाली. याप्रकरणी शुभम अनिलकुमार टिके (वय 25, रा. कामगारनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या, चांदीचे दागिने, लॅपटॉप, रोख रक्कम असा एकूण 75 हजारांचा ऐवज चोरून नेला.

चाकण, वाकड, हिंजवडीत तीन वाहनचो-या

चाकण, वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. चाकण पोलीस ठाण्यात दत्तात्रय काळुराम कारंडे (वय 35, रा. वराळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजारांची दुचाकी त्यांच्या घराच्या अंगणातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. कुलदीप मारुती इंगळे (वय 24, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरासमोरून त्यांची 15 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर राजू सुभाष नाईक (वय 32, रा. चांदणी चौक, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची सुसगावातून 25 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

वाकडमध्ये लेबर ठेकेदाराचा मोबाईल पळवला

चंद्रमाउली गार्डनच्या गेटजवळ असलेल्या बासुंदी चहाच्या दुकानाजवळ चहा पिऊन झाल्यानंतर बिल देत असताना लेबर ठेकेदाराचा मोबाईल फोन दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी रामराम बन्सी सगणे (वय 42, रा. काळाखडक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button