breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्यासह मंत्र्याना पिंपरी चिंचवडमध्ये पाय ठेवू देणार नाही

संभाजी बिग्रेडचा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे इशारा

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

अखंड विश्वाचे प्रेरणास्थान, विश्ववंदनीय कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी बदनामीकारण व्हिडिओ आणि लेख प्रसारित केले. त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अन्य मंत्र्यांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखंड विश्र्वाचे प्रेरणास्थान, विश्ववंदनीय, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज कधीही मागे न हटता स्वराज्य निर्मिती केली. रयतेच्या रक्षणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढले. महाराजांनी अनेक लढाया करुन त्या जिंकल्यासुध्दा. महाराजांनी संपूर्ण आयुष्यात ३५० पेक्षाही जास्त किल्ले जिंकले व बांधले.

अखंड हिंदुस्थानावर चारही बाजूंनी मोगल साम्राज्य असतांना देखील शिवरायांनी रयतेचे मराठा स्वराज्य स्थापन केले होते. औरंगजेब सारखा बलाढ्य शत्रु देखिल छत्रपती शिवाजी महाराजांना उभ्या हयातीत हरवू शकला नव्हता. संपूर्ण आयुष्यभर औरंगजेबाला स्वराज्य मुलुख जिंकण्यापासुन वंचित राहावे लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच आघाड्यांवर श्रेष्ठ ठरत होते. महाराजांनी मोगल पोर्तुगीज डच अशा बलाढ्य शत्रुसमोर देखील आपले गुडघे टेकले नव्हते. तसेच आपला मुकुट व तलवार कोणा समोर अर्पण केली नव्हती.

परंतु आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी जाणुन-बुजून छत्रपती शिवाजी महाराज लढाया करुन थकुण गेले आहेत. ते रामदासाच्या समोर आपले गुडघे टेकून, आपला मुकुट व तलवार अर्पण करीत असल्याचा अनऐतिहासिक बदनामीकारक व्हिडिओ आपल्या यु ट्युब चैनलवरुन प्रसारीत केलेला आहे. तसेच लेखणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहरात अनेक आंदोलने केली. तसेच पोलीस आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना निवेदने देऊन देखील अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही जो पर्यंत श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या एकाही मंत्र्याला पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेऊ देणार नाही. असा इशारा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, पुणे जिल्हा संघटक ज्ञानदेव लोभे, उपाध्यक्ष सतिश कदम, संघटक वैभव जाधव यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button