TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराष्ट्रिय

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्ते होणार ‘हायटेक’

महापालिका प्रशासनाची तयारी : रस्त्यांचे नूतनीकरण करणार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात शहरीकरण व नागरिकरणामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडणे आवश्यक झाले आहे. त्यानुसार स्थापत्य प्रकल्प विभागाने रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे.

टेल्को रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. त्यापैकी गवळी माथा ते सेच्युरी एन्का चौकापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने पुर्ण रुंदीने विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या रस्त्याचे सलग पादचारी मार्ग, सलग सायकल मार्ग, आवश्यक त्या ठिकाणी सेवा रस्ता व Recreational Area तयार करणे या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्याचे स्थापत्य विभाग, ‘क’ क्षेत्रिय कार्यालयामार्फत नियोजन करण्यात येत आहे.

दरम्यान याच पद्धतीने डांगे चौक ते हिंजवडी हद्दीपर्यंत, कुणाल आयकॉन रस्ता शिवार चौक ते गोविंद गार्डन पर्यंत आणि बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकापर्यंतच्या रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे महानगरपालिकेने नियोजन केले असून त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून पुर्ण रस्त्याचे डिझाईन अंतिम करावयाचा महानगरपालिकेचा मानस आहे.

नागरिकांचे अभिप्राय मागवले…
सद्यस्थितीतील सेवा रस्ता, पादचारी मार्ग, सायकल चालविणेस सुरक्षित असा नियोजित रस्ता याचे सादरीकरण महानगरपालिकेच्या Website व स्मार्ट सिटी Website App येथे पाहण्यास पालिका उपलब्ध करून देणार आहे. नागरिकांनी याबाबत त्यांचे अभिप्रायः मनपाच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in, स्मार्टसिटी संकेतस्थळ [email protected] यावर प्रसिद्धीपासुन १० दिवसाच्या आत द्यावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button