पिंपरी / चिंचवड

चिंचवड परिसरात सुरु असलेल्या विकासकामांमधील नियोजनाच्या अभावामुळे नागरिक हैराण

– पिंपरी चिंचवड भाजपाचे सचिव मधुकर बच्चे यांचे ब क्षेत्रीय अधिका-यांना निवेदन

पिंपरी l प्रतिनिधी

चिंचवड प्रभागात चिंचवड गावठाण, रस्टन कॉलनी, लिंक रोड, तानाजी नगर, काकडे पार्क, केशवनगर चिंचवड आदी भागात महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामे केली जात आहेत. मागील अनेक दिवसांपासून ही कामे सुरु असून ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व पिंपरी चिंचवड भाजपाचे सचिव मधुकर बच्चे यांनी ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय आधिकारी अभिजित हाराळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे.

विकासकामांसाठी खोदकाम किंवा अन्य कामे करताना नागरिकांना मनस्ताप होणार नाही, वाहतूक अडथळा होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेकदा खोदकामाच्या जवळ गेल्यानंतर रस्ता बंद असल्याचे वाहन चालकांच्या निदर्शनास येते. मोठी वाहने रस्त्यावरून वळू शकत नसल्याने वाहतूक कोंडी होते. यासाठी योग्य त्या ठिकाणी सूचनांचे फलक लावून, वाहतूक नियमनासाठी नेमणूक करून गर्दी कमी केल्यास त्याचा नागरिकांना फायदा होईल.

ज्या ठिकाणी काम सुरु आहे, त्या भागात सोसायटी धारक देखील मेटाकुटीला आले आहेत. अनेकवेळा लहान मोठे अपघात होतात. या सर्व बाबींची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यावर पालिकेच्या अधिका-याना योग्य नियंत्रण न ठेवता आल्याने असे प्रसंग घडत आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, याबाबत संबंधित ठेकेदारांना पालिकेने कठोर सूचना देणे आवश्यक असल्याचे मधुकर बच्चे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button