breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनियाचा धोका सर्वात जास्त; अशी घ्या काळजी!

Child Care : तापमानातील चढ-उतार आणि उच्च आर्द्रता यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरत आहेत. यावर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. याच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ येणे, कोरडा खोकला, सर्दी, थकवा, उलट्या, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात.

अशी घ्या काळजी!

स्वच्छता राखा : हातांची स्वच्छता राखल्याने देखील न्यूमोनियापासून चांगले संरक्षण होते. जर हात स्वच्छ धुतले गेले नाहीत, तर हे संसर्गजन्य घटक श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात.

हेही वाचा  –  आयकर विभागाची मोठी कारवाई, १५० कोटींची रोकड जप्त 

धूम्रपान करू नका : धूम्रपानामुळे फुफ्फुसांना संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला न्यूमोनियाचा धोका वाढतो.

कोणत्या लसी न्यूमोनियाला प्रतिबंध करतात : लसीकरणाद्वारे देखील न्यूमोनिया टाळता येऊ शकतो. PCV१३ आणि PPSV२३ लसी विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी धोका कमी करतात.

सर्दीपासून बचाव : सामान्य सर्दीपासून बचाव करण्यासाठी औषधे वेळेवर घ्या. कारण यामुळे सामान्य सर्दीपासून आराम मिळतो. न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button