breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर, 321 कोरोना रुग्णांची वाढ, तर मुंबईत रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबई: नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नवी मुंबईत आज दिवसभरात सर्वाधिक 321 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजार 393 वर पोहोचला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. आज (24 जून) एका दिवसात नवी मुंबईत 321 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात बेलापूर 33, नेरुळ 51, वाशी 25, तुर्भे 16, कोपरखैरणे 41, घणसोली 54, ऐरोली 82, दिघा 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तर एका दिवसात 85 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 3 हजार 086 इतका झाला आहे. तर नवी मुंबईत 3 कोरोनाबळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 180 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button