ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

गोळया झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना अवघ्या दोन तासातच ठोकल्या बेडया

भोसरी : जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ सार्वजनिक रोडवर रविवार, 12 मे रोजी सायंकाळी ०६.०० वाजताचे सुमारास फायरिंग झाल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर व चिखली पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जावून जखमी अजय सुनिल फुले वय १९ वर्ष धंदा व्यवसाय, रा. महावीर पार्क सोसायटी, गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, “आरोपी हर्षल सोनावणे व त्यांचे दोघाचेही जाधववाडी परीसरात गॅस शेगडया दुरुस्तीची दुकाने असून, त्यांच्यात गेल्या सहा महिन्यापासून व्यवसायीक वाद होते. गिऱ्हाईक तोडण्याच्या प्रकारावरुन त्याच्यात वांरवांर खटके उडत होते. याच बाबीचा राग मनात धरुन हर्षल सोनवणे याने शाम चौधरी व किर्तीकुमार लिलारे यांच्यासोबत कट करुन आरोपी शाम चौधरी व किर्तीकुमार यांना त्याच्या दुकानावर पाठवुन त्याच्यातील वाद मिटवण्याच्या बहान्याने चर्चा करण्यासाठी त्यास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोडवर घेवून गेले. तेथे चर्चा करत असताना नियोजीत कटानुसार हर्षल सोनावणे हा तेथे आला व त्याने त्याचे कमरेला असलेले पिस्टल काढून त्यातुन तीन गोळया फिर्यादीवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी फिर्यादीचे दंडाला लागुन त्यास जखमी केले तर दुसरी गोळी सहआरोपी किर्तीकुमार लिलारे यास मानेला लागली.” अशी हकीकत सांगितली.

त्यानंतर फिर्यादी अजय फुले यांना तात्काळ उपचाराकरीता वायसीएम हॉस्पीटल पिंपरी पुणे येथे पाठवून त्यांचे तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर २८२ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४,३४ आर्म अॅक्ट ३, २५,महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.

निवडणुकीच्या एक दिवस आधी गोळाबाराचा प्रकार घडल्याने वरीष्ट पातळीवरुन तात्काळ त्याची दखल घेवून घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली चिखली पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उध्दव खाडे व तपास पथक यांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासात एक आरोपी जखमी असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तात्काळ घटनास्थळाचे परीसरातील हॉस्पीटल चेक करणेकामी पाठविण्यात आले. सदर पथकाने हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या वॉटस अप ग्रुपवर माहिती प्रसारीत केली असता, गुन्हयातील जखमी आरोपी किर्तीकुमार लिलारे हा ओझोन हॉस्पीटल, मोरवाडी, पिंपरी, पुणे येथे अॅडमिट असल्याची माहीती मिळाली. त्याच्याकडुन प्राप्त माहितीच्या अधारावर पोलीसांनी पुढिल तपास सुरु केला.

दाखल गुन्हयाचा समांतर तपास करत असलेले गुन्हे शाखा युनिट-१ चे पो. नि. गोरक्ष कुंभार याच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अधारावर फरार आरोपी श्याम चौधरी यास देहुरोड परीसरातुन ताब्यात घेण्यात यश मिळवले. गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनावणे हा घटनेनंतर त्याचा मोबाईल बंद करुन पळुन गेलेला होता. त्यामुळे त्यास निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंघाने तात्काळ अटक करण्याचे मोठे अव्हान होते. चिखली पोलीस तपास पथकाने त्याच्या पळुन जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले असता तो चाकणच्या दिशेने गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. स.पो.नि. उदधव खाडे व त्याच्या पथकाने त्याचा पाठपुरावा करत, माग काढत शेवटी त्यास नाणेकरवाडी, चाकण परीसरातून पकडण्यात यश मिळवले.

तपासात अटक आरोपी व फिर्यादी यांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी कोणत्याच प्रकारचे हितसंबंध नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. अश्या प्रकाराने संवेदनशिल कालावधीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपीना दोन तासात अटक करण्यात चिखली पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट – १ यांना यश मिळालेले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो. मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा मा. संदीप डोईफोडे सो, मा. पोलीस उप आयुक्त, परी ३ डॉ. शिवाजी पवार, मा. सहायक पोलीस आयुक्त सो, भोसरी एमआयडीसी विभाग, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे मार्गदर्शनाखाली, ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे, सहा. फौज वडेकर, सहा. फौज कडलग, पोहवा / बाबा गर्जे, पोहवा / संदीप मासाळ, पोहवा / विश्वास नाणेकर, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / आनंदा नांगरे, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा / सुनिल शिंदे, पोना पोना / अमर कांबळे, पोना / कबीर पिंजारी, पोना / संदीप राठोड तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे पो. नि. गोरक्ष कुंभार याच्या अधिपत्याखाली पो. हवा. ९८४ बोऱ्हाडे, पो. हवा. ९७७ जावळे, पो.शि. २९५९ महाले, पो.शि. २८१० रूपनवर, जायभाये यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button