breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

कल्याणच्या सभेत नरेंद्र मोदींकडून आनंद दिघे यांचा उल्लेख; म्हणाले…

कल्याण : कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला माझा नमस्कार…, असं म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. या सभेत त्यांनी आनंद दिघे यांचा उल्लेख केला. मी आनंद दिघेंना श्रद्धांजली अपर्ण करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेद्र मोदींनी भाषणाला सुरूवात केली. राष्ट्र कल्याणासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. मुख्य कसोटीचं केंद्र बनलेलं आहे. 25 कोटी भावा-बहिणीला बाहेर निघताना पाहतो आहे. पहिली बार गरिबाकडे मोफत उपचारासाठी गँरटी कार्ड आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सभेतून लवकर निघायचं होतं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांना जाण्याची विनंती केली. एकनाथ शिंदे तुम्ही पुढे निघा मी येथे सांभाळून घेतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यानंतर मोदींच्या रोड शोसाठी एकनाथ शिंदे आधीच मुंबईकडे रवाना झाले.

हेही वाचा     –      ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना धडा शिकवू’; सतीश काळे 

आपके स्वप्ने मोदी मोदी का संकल्प है, मेरा पल मेरा पल आपके नाम है… 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस मी तुमच्यासोबत असणार आहे. भारत आज ज्या उंचीवर पोहोचला आहे. एक नवीन विश्वास आणि उमंग आलेली आहे. देशातून पुढे कोण घेवून जावू शकतो, असं मोदी या सभेत म्हणाले.

ज्या लोकांनी गरिबी हटाव खोटा नारा दिला. नेहरूच्या जमान्यापासून ते 2014 गरिबीचा अफीमची माळ जपत होते. गरिब गरिब गरिब गरिब अशी माला जपायचे… भ्रष्टाचाराला काँग्रेसने शिष्टाचार बनवलं होतं. तुमचे स्वप्न हे लोक पुर्ण करू शकतात का? मागच्या सरकारमध्ये काँग्रेस हिंदु मुस्लिम करणं फक्त माहिती आहे. मोदी हिंदु मुस्लिमाच्या नावावर राजकारण करत नाही. मी काँग्रेसला चँलेज देतो यांचं उत्तर काँग्रेसनं द्यावं. आई-वडिलांना आठण्यासाठी अल्बम खोलत आहेत. तुम्हाला कुणाची आठवण काढण्यासाठी अल्बम लागतो का? हिंदु बजेट आणि मुस्लिम बजेट, असं वेगवेगळं होवू शकतं का? काँग्रेस पक्ष हे पाप करत होतं, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button