breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्र्यांचा सभागृहात सर्वात गंभीर आरोप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांच्या विरोधात चांगलेच फटकेबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. “विरोधकांची एकच स्क्रिफ्ट आणि एकच ड्राफ्ट असतो. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना? त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होच चालले आहेत. नाना पटोले तुम्ही प्रामाणिकपणे कबुल करा, तुम्ही खासगीमध्ये जेव्हा भेटता तेव्हा कबूल करता की, चांगले निर्णय घेतले आहेत. जे आहे ते घेतले आहेत. पैसे दिले आहेत. तुम्हाला कुठेही बोट दायखवायला जागा आम्ही सरकार देत नाहीत. तुम्ही मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तर टीका केली पाहिजे. पण काही बोलायचं नसेल तर मुद्द्यावर बोलायचं नाही. अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं हे सगळं बाहेर आणि आत चालू असतो”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“आम्हाला खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतले आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. शिवसेनेच्या खात्यातले ५० कोटी घेतले”, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाही म्हणून… मी नाही म्हणत, कुणीतरी म्हटलं आहे”, असं शिंदे म्हणाले.

हेही वाचा – सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

“तयतयाट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून, रोजच सुरु आहे, हे काय? अशी नवीन राजकीय संस्कृती जी निर्माण झालीय ते बरोबर नाही. स्वार्थासाठी विचार विकेलेल्यांनी अशाप्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकली, आयडोलॉजी विकली, सत्तेसाठी सर्व केलं, पण मग सरकार चांगलं काम करतं तर टीका करतात. नाना तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. सारखं चोरलं म्हणून बोलायचं ही कोणती भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोलाना. जाहीरपणे बोला. जे देतोय ते जाहीरपणे देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“विरोधी पक्षनेते कुठे आहेत? मी त्यांचं भाषण सुरु आहे म्हणून आलो. मी त्यांचं ऐकून घेतलं. पण आता माझी बोलण्याची वेळ आली तर निघून गेले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन चाकं आहेत. ते येत आहेत तर ठीक आहे. विरोधकांचा बाराही महिने राजकीय धुळवड करण्याचा प्रयत्न हा अतिशय केविलपणाचा आहे”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button