breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने’, सदाभाऊ खोत यांच्या वेदनेला भटांच्या गझलेचा आधार

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष खेळीमुळे राज्यसभेत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले. आवश्यक संख्याबळ नसतानाही फडणवीसांनी चमत्कार घडवला. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही फडणवीस असाच चमत्कार घडवतील, अशी चर्चा भाजपच्या गोटात होऊ लागली. ठरल्याप्रमाणे भाजपने अधिकृत पाच आणि सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप पुरस्कृत सहावा उमेदवार रिंगणात उतरवला. पण तीन दिवसांत बऱ्याच घडामोडी झाल्या. अन् अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदाभाऊंनी भाजपच्या नेतृत्वाच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या माघारीनंतर पुढील राजकीय वाटचालीविषयी उलट सुलट चर्चा होतायत. अशातच सदाभाऊंनी आपल्या वेदनेला गझलेचा आधार घेत छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने… असा निर्धार व्यक्त केलाय.

२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तत्पूर्वी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. सदाभाऊंनी अर्ज मागे घेतला, त्याक्षणापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा होतीये.

छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने, सदाभाऊंचा हुंकार

विधान परिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर सदाभाऊंनी फार विचार न करता मुंबई सोडली. ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढार पट्ट्यात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तिथला शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी रात्रीच्या अंधारात नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.

तत्पूर्वी त्यांनी आज ट्विटरवरुन गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा आधार घेऊन आपल्या राजकीय वाटचालीची दिशा त्यांनी स्पष्ट केली. विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… असं म्हणत पुन्हा गरुडभरारी घेण्याचा आशावाद सदाभाऊंनी व्यक्त केलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button