breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यसभेसाठी मुख्यमंत्री MIM-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत- मनसे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत असून या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.

राज्यसभा निवडणूक जवळ आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून सहाव्या जागेसाठी आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून हालचालीही सुरू आहेत. या मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे दिवंगत बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे?’ असा खरमरीत सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

औरंगाबादमधील सभेवरूनही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. ‘संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, मात्र लवंगी वाजली तरी पुरे,’ असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेतून उद्धव ठाकरे हे भाजप आणि मनसेचा कसा समाचार घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button