breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हळदीचं उत्पन्न दाखवताना फोटो चक्क नारळाचा

मुंबई – भाजपाच्या सोशल मीडिया टीमकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरताना मोठी चूक झाली आहे. ‘सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला’ या कॅप्शनने एका फोटो देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजकडून वापरण्यात आला आहे. मात्र, या फोटोवर लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यावर हळदीचं पीक घेतल्याचं सांगताना, तेथे चक्क नाराळाच्या रोपांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्सने सोशल मीडियावर भाजपाच्या आयटी टीमचा चांगलाचा समाचार घेतला आहे.

भाजपाच्या आयटी टीमकडूनही नेहमीच प्रभावीपणे भाजपा नेते आणि भाजपाचा प्रचार केला जातो. या टीमचे दाखलेही देण्यात येतात. मात्र, या टीमकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो वापरताना मोठी चूक करण्यात आली होती. नारळाच्या रोपवाटिकेचा फोटो चक्क हळदीचे पीक म्हणून खपविण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी लोहा (जिल्हा नांदेड) गावात सपाट जमीन आहे. मात्र, तिथे त्यांनी निसर्गरम्य हिरवेगार डोंगर दाखवले आहेत. तर, हळदीचे विक्रमी उत्पन्न सांगताना, चक्क नाराळाची पिके वापरली आहेत. त्याठिकाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसून येत असून देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र असा लोगोही या फोटोवर दिसत आहे. मात्र, जागृत नेटीझन्सला ही चूक लक्षात येताच, भाजपच्या आयटी सेलला आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा काम नेटीझन्सने सुरू केलं आहे.

इंटरनेटवरन शांघायची चित्रे घेऊन त्यांना अहमदाबाद म्हणून दाखवण्याचा प्रकार भाजपने गेल्या निवडणुकीत केला होता. याबाबतही नेटीझन्स आणि संबंधित पक्षांकडून भाजपाच्या आयटी सेलवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर, आता पुन्हा तोच प्रकार निवडणूक काळात घडताना दिसून येत आहे. दरम्यान, काही वेळातच आपली चूक लक्षात येता, भाजपाच्या सोशल मीडिया टीमने हा फोटो फेसबुक पेजवरुन हटवला असून त्याऐवजी नवीन एडिटेड फोटो वापरण्यात आला आहे. मात्र, नेटीझन्सने स्क्रीनशॉट काढून नारळाच्या रोपांचा तो जुनाच फोटो व्हायरल केला आहे. त्यामुळे चूक दुरुस्त केली असली तरी, झालेली चुकीवरुन सोशल मीडियावर भाजपाची आणि मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button