TOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या विचारांतुन राष्ट्रीय भावना जिवंत: श्रीमंत शिवाजीराजे भोसले

पुण्यातील पहिल्या राष्ट्रीय मावळा परिषदेत देशवासीयांंची शिवरायांना मानवंदना

पुणे: जय शिवराय च्या जय घोषात , मर्दानी खेळांच्या गजरात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय मावळा परिषदेत शेकडो देशवासीयांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्त मावळा जवान संघटनेच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

तंजावर (तामिळनाडू) चे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार भिमराव तापकीर होते.
यावेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे लिखित मराठी भाषेतील शिवचरित्राचे कृष्णकुमार गुप्ता यांनी अनुदानित केलेल्या द वर्ल्ड लिडर छत्रपती शिवाजी महाराज या इंग्रजी भाषेतील शिवचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीमंत शिवाजीराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतुन राष्ट्रीय भावना जिवंत होत आहे. आजही शिवरायांची शिकवण प्रेरणादायी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात शिवरायांवर प्रेम करणारा मावळा आहे. महाराष्ट्रातील अनेक पंरापरा दक्षिण भारतात जपल्या जात आहेत. तंजावरच्या ग्रंथालयात विविध भाषेतील लाखो प्राचीन शिवकालीन कागदपत्रे,दस्तावेज आहेत. त्यातून शिवकालीन इतिहास पुढे येत आहे.

यावेळी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, राजाभाऊ पासलकर, माजी सनदी अधिकारी राजेंद्र चव्हाण, माजी पोलीस अधिकारी भारत निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, कर्नाटक क्षेत्रिय मराठा संघाचे अण्णाजीराव नलावडे,अँड.नरसिंह लगड, सचिन पायगुडे, आंध्र प्रदेशच्या द्रविड विद्यापीठाचे प्राध्यापक विवेकानंद गोपाल, सुरेश मोहिते, प्रतापराव मरळ , रुपेश घुले, बाजीराव पारगे, सुरेश देसाई, लक्ष्मण माताळे, विजय तनपुरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी केले.

सुत्रसंचलन शांताराम गोरड, ओंकार यादव, रेश्मा निर्मळ , श्रीकांत ढमाळ यांनी केले.
संयोजन मावळा जवान संघटनेचे युवक अध्यक्ष रोहित नलावडे, प्रदिप ढुके रोहित महापुरे आदींनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button