breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उचलबांगडी ?, त्यांच्या जागी रुबल अगरवाल यांची लागणार वर्णी

सत्ताधारी भाजपच्या कारभारामुळे आयुक्त झाले बदनाम

पालकमंत्री अजित पवारांनी बदलीचा मुद्दा घेतला मनावर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपचा मनमानी कारभार आणि त्यांच्या ‘हो ला हो’ म्हणणारे आयुक्त असा शिक्का पडल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रतिमा मलीन झाली. सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्र हरपल्यानंतर हर्डीकर एकाकी पडले. त्यावर त्यांनी बदली करुन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्याचा किस्सा चांगलाच गाजला होता. आता दादांनी हर्डीकरांची उचलबांगडी करण्याचे चांगलेच मनावर घेतल्याचे दिसते. त्यांच्याजागी रुबल अगरवाल यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवे आयुक्त कोण येणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने येणारे आयुक्त आपल्या मर्जीतले असावेत यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार “फिल्डिंग’ लावून सध्या, विदर्भ आणि कोकणात कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे येथील कारभाऱ्यांनी सुचविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्याच्या राजकारणाची सूत्र महाविकासआघाडीच्या हातात गेल्यानंतर व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या आयुक्तांची स्वतः निवड करण्याचे ठरवून येथील सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आयुक्त वैतागले आहेत. पालिकेच्या कारभारात भाजप पदाधिकाऱ्यांचा वारंवार होणारा हस्तक्षेप आणि वादग्रस्त मुद्दा आल्यानंतर टिकेचे धनी व्हावे लागत असल्याने आयुक्तांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या मध्यस्थीने अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. भेटीदरम्यान त्यांच्यात बदली संदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात होते. त्यावर पिंपरी महापालिकेला आपल्यासारख्या सक्षम अधिका-याची गरज असून तुर्तास बदलीचा विषय प्रलंबित ठेवावा, अशी सूचना दादांनी केली होती. म्हणूनच, आयुक्तांना पुढे काम करण्याची संधी मिळाली. मात्र, दादांनी आता हर्डीकरांच्या बदलीचा मुद्दा चांगलाच मनावर घेतल्याचे दिसते. त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा पालिकेत सुरु आहे.

रुबल अगरवाल या निष्कलंक अधिकारी आहेत. यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. शिवाय त्यांचा अनुभव, अभ्यास आणि त्यांच्याकडून अडचणींवर मात करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचे प्रेझेंटेशन’ने प्रभावी होऊन त्यांना पिंपरी – चिंचवड शहराच्या आयुक्तपदी आणण्यासाठी अजितदादा’ आग्रही असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रुबल अगरवाल यांच्यावरील जबाबदारी

मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. 2008 बॅचच्या अधिकारी अकोला उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, शिर्डी संस्थान सीईओ मुंबई, मराठवाडा विभागात प्रशासकीय कामाचा प्रगल्भ अनुभव आहे. सध्या पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button