TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘भाजयुमो’च्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण

  • दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उपक्रम
  • शहराध्यक्ष संकेत चोंधे, सचिव सचिन बंदी यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण करण्यात आली. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्वात मोठे ‘‘महाआरोग्य शिबीर’’ आयोजित करणारे दिवंगत आमदार जगताप यांचा रुग्णसेवेचा वसा कायम ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन भाजयुमोचे सचिव सचिन बंदी यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश अण्णा पिल्ले, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र सहसंयोजिका युवती विभाग वैशाली खाडये, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, सरचिटणीस तेजस्विनी कदम, नवनाथ भाऊ जांभुळकर, सुधीर भाऊ वाल्हेकर, निरंजन राऊत, तेजस फाळके, दिनेश जगताप, चेतन साबळे, समिर साबळे, जगदिश महाले, अशितोष शेळके, अक्षय मोरे, माऊली गावडे, आरती बंदी, युवराज धोत्रे, अक्षय सोनार, पंकज ठाकूर, सागर शोनू, औदुंबर कळसाईत, कैलास हिरेमठ, ज्येष्ठ नागरिक गोविंद घटोल, प्रमोद हिवाळे आदी उपस्थित होते.

संकेत चोंधे म्हणाले की, स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी आम्हा नवोदित कार्यकर्त्यांना कायम लोकांच्या हितासाठी काम करीत राहण्याचे संस्कार दिले आहेत. त्याच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परिसरातील सामान्य कुटुंबातील नागरिकांना आपातकालीन परिस्थितीत तात्काळ रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध करण्यासाठी युवा मोर्चातर्फे पुढाकार घेण्यात आला, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button