breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह देशभरात नाताळचं सेलिब्रेशन ;नियंत्रण रेषेवरही जवानांनी साजरा केला ख्रिसमस

मुंबई | नाताळनिमित्त (ख्रिसमस) मुंबई, नाशिक, वसई, गोव्य़ासह देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. विविध शहरातल्या बाजारपेठा नाताळनिमित्त फुलून गेल्या आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी आकाश कंदिल यासह विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सर्व चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशकातील कॅनडा कॉर्नर परिसरातील सेंट आंद्रिया चर्चला रोषणाई करण्यात आली असून चर्चबाहेर येशूंचा जिथे जन्म झाला त्या गाईच्या गोठ्याची प्रतिकृती साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

ख्रिसमसचा हाच उत्साह सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्या अनेक जवानांमध्येही पाहायला मिळाला. त्यांच्या याच उत्साहाची प्रचिती देणारा एक व्हिडिओ एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपाशी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हे सर्व जवान अतिशय आनंदाच्या वातावरणात ‘जिंगल बेल्स जिंगल बेल्स’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ‘स्नो मॅन’ आणि चक्क सँटाक्लॉजही दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button