breaking-newsताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनो..बोर्डाच्या परीक्षा देण्यापूर्वी या ५ गोष्टी बदला! पेपर सोडवणे होईल सोपे

Board Exam Tips | SSC, HSC सह अनेक बोर्डांच्या परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार आहेत. बसलेल्या विद्यार्थ्यांनी या दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करणं महत्वाचं आहे. यातच जर तुम्हाला १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या सवयी आणि तयारीच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. याचबद्द आज आम्ही तुम्हा सांगणार आहोत..

अभ्यास करण्यास टाळाटाळ करू नका : बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी उद्याचा अभ्यास पुढे ढकलण्याच्या सवयीपासून दूर राहा. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधी अंतिम उजळणी केल्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी ताण येणार नाही.

अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या : बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष दया. अभ्यास करताना नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा.

हेही वाचा    –    ‘काँग्रेसने फक्त एकाच परिवाराला भारतरत्न दिले’; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 

वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे : एसएससी, एचएससी, सीबीएसई, आयसीएसई, आरबीएसईच्या कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन करा.

सोशल मीडियापासून दूर राहा : सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे आत्तापासूनच सोशल मीडियापासून दूर राहा.

तुमच्या सवयींमध्ये सुधारणा करा : बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा. तसेच एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी ७-८ तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button