breaking-newsमहाराष्ट्र

खुशखबर ! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त करण्यात आलं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता 5 रुपयांनी स्वस्त झालं आहे. उद्यापासून नवे दर लागू होतील अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून इंधनाचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Thank you Hon PM @narendramodi ji and Union Minister @arunjaitley ji for reducing ₹2.50/litre on both Diesel and Petrol. This will give huge relief to common citizens.

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Maharashtra Government also decided to give additional relief of ₹2.5/litre on Petrol to give total benefit of ₹5/litre in the State of Maharashtra.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील राज्यात पेट्रोल आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा केली.

याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील एक्साइज ड्युटी केंद्र सरकारकडून १ रुपया ५० कमी करण्यात आली आहे, तर ओएमसी अर्थात तेल कंपन्यांकडून १ रुपया कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करतो आहोत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी. म्हणजेच पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी कमी आकारावा म्हणजे ग्राहकांना पाच रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल. यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांशी चर्चा करणार आहोत त्यांनी त्वरित यासंदर्भात घोषणा करावी असे आवाहन आम्ही करणार आहोत. जेणेकरून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांची सूट मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button