breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

Chandrayaan-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले..

Chandrayaan-3 : संपुर्ण जगाचे लक्ष असलेल्या Chandrayaan-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं. असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.

हेही वाचा – अनिल बोंडे यांची शरद पवार यांच्यावर खोचक टीका; म्हणाले, आता बोलायला…

आतापर्यंत चंद्रयान ३ चा प्रवास

  • १४ जुलैला चंद्रयान 3, १७० किमी ते ३६५०० किमी परिघात सोडलं होतं. चंद्राच्या दिशेने जाताना अंडाकृती फिरत ते जवळ जात होतं.
  • १५ जुलैला चंद्रयान 3 चं परिघ वाढवून ४१७६२ किमी ते १७३ किमी केलं गेलं.
  • १७ जुलैला दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आमि ४१६०३ किमी ते २२६ किमी करण्यात आला.
  • १८ जुलैला तिसऱ्यांदा परिघ वाढवून ५१४०० किमी ते २२८ किमी करण्यात आला.
  • २० जुलै रोजी चौथ्यांदा परिघ वाढवून ७१३५१ किमी ते २३३ किमी इतका करण्यात आला.
  • २५ जुलैला पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि १,२७,६०३ किमी ते २३६ किमी करण्यात आला.
  • ३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केलं.
  • ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
  • २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button