breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चंद्रपूर लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक? प्रकृतीबाबाबत उलटसुलट चर्चा

चंद्रपूर: गेल्या काही तासांपासून चंद्रपूर लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाळू धानोरकर यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील प्राथमिक उपचारांनंतर धानोरकरांना पुढील उपचारासाठी दिल्लीला एअर ऍम्बुलन्सच्या माध्यमातून हलवल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. नुकतेच खासदार धानोरकरांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले होते. रविवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळू धानोरकरांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. यांनतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अस्वस्थ वाटत असल्याने आपण रुग्णालयात दाखल होत असून, हितचिंतकांनी तसेच समर्थकांनी घाबरून जाऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार तपासणी आणि उपचार करून थोडे दिवस विश्रांती घेणार आहे’,अशा आशयाची पोस्ट केली होती. मात्र, तरीही बाळू धानोरकरांच्या प्रकृतीबद्दल उलट सुलट चर्चा सुरूच होत्या.

या सगळ्या प्रकरणाला पूर्णविराम देण्यासाठी धानोरकरांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर साहेब यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत तसेच त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाज माध्यमावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. मा. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करूया. असे म्हणत धानोरकरांच्या प्रकृतीबद्दल कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button