breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsAUS20-20: नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

सिडनी – लागोपाठ दोन टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळविल्यानंतर आज भारतीय संघ अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या टी-२० सामन्यातही नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा :- IND vsAUS20-20: भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना

यापूर्वीच्या दोन्ही टी-२० सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तर दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर जोडीने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने अशक्यप्राय सामना जिंकला. तसेच आयपीएल गाजवणारा यॉर्कर किंग टी. नटराजननेही आपली छाप पाडली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने दुखापतीमधून सावरत अखेरच्या सामन्यासाठी संघात पदार्पण केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button