breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

राज्यसभेनंतर चंद्रकांत पाटील जोमात; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या जागा जाहीर करून टाकल्या!

कोल्हापूर : राज्यसभेतील सहाव्या जागेवरील अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीला अस्मान दाखवत विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. याच आत्मविश्वासाचे प्रतिबिंब भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या दाव्यातूनही दिसत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळणार असल्याचा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकांमध्ये किती जागा निवडून येणार, याबाबतची भविष्यवाणीही केली आहे. ‘२०२४ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात भाजपचंच सरकार येईल. लोकसभेत भाजपला ४२ ते ४३ जागा मिळतील आणि विधानसभेत आमचे १६० ते १७० आमदार निवडून येतील,’ असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

‘राज्यसभा तो झांकी है….’

राज्यात नुकतीच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी कोणाकडेच हक्काची पुरेशी मते नव्हती. निवडणुकीआधी तर महाविकास आघाडीचा उमेदवार मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र पडद्याआडून भाजपने वेगवान हालचाली करत अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचलं आणि सहाव्या जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला.

मात्र राज्यसभा तो झांकी, विधानपरिषद अभी बाकी है, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने अनेक जण सद्सद्विवेकबुद्धीने भाजपला मतदान करतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button