breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

प्रो कब्बडी लीगला मिळाला नवा चॅम्पियन! पुणेरी पलटनचा हरियाणा स्टीलर्सना धोबीपछाड

Pro Kabaddi 24 Final | प्रो कबड्डी लीग स्पर्धाच्या १० व्या हंगामात पुणेरी पलटन संघ विजयी ठरला आहे. आज झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा २८-२५ असा पराभव करत प्रो कबड्डी लीगच १०वा हंगाम जिंकला. संघाने प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र यंदाच्या पर्वात जबरदस्त कमबॅक करत जेतेपदावर नाव कोरलं.

पहिल्या ब्रेकपर्यंत पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सवर १०-१३ ने आघाडी घेतली होती. दोन्ही संघांमध्ये अवघ्या तीन गुणांचा फरक होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही पुणेरी पलटणचा जलवा दिसला. सुरुवातीलाच बॅकफूटवर गेलेल्या हरयाणावर गुण मिळवत आघाडी मिळवली. पण हे अंतरही जेव्हा कमी होत होतं तेव्हा मात्र चाहत्यांची धाकधूक वाढत होती. शेवटी पुणेरी पलटणने २८-२५ ने मात दिली. प्रो कबड्डीच्या इतिहासात पुणेरी पलटण सातवा विजेता ठरला आहे. पंकज मोहितेच्या रेडमुळे पुणेरी पलटला ४ गुणांची कमाई झाली. त्यामुळे विजयी अवघ्या तीन गुणाने शक्य झाला. विजयात खरा हिरो पंकज मोहिते ठरला.

हेही वाचा      –       पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता पवार विरुद्ध पवार…; फडणवीस यांचा टोला

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एकूण १२ संघांनी भाग घेतला होता. प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स, दुसऱ्या पर्वात यू मुंबा, तिसऱ्या पर्वात पटणा पायरेट्स, चौथ्या पर्वात पटणा पायरेट्स, पाचव्या पर्वात पटणा पायरेट्स, सहाव्या पर्वात बंगळुरु बुल्स, सातव्या पर्वात बंगाल वॉरियर्स, आठव्या पर्वात दंबग दिल्ली आणि नवव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सने जेतेपद मिळवलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button