TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

आजही सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत असून रविवारी सायंकाळीही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर हवामान ढगाळ राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत पुन्हा एकदा पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्यानंतर पाच सहा दिवस सलग सायंकाळी पाऊस पडतो आहे. मुंबईत शनिवारी मुसळधार पाऊस पडला नसला तरी सायंकाळी हलक्या सरींनी हजेरी लावली. शहर भागात ५.२६ मिमी, पूर्व उपनगरात १०.१८मिमी तर पश्चिम उपनगरात १०.८१ मिमी पाऊस झाला.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सायंकाळी आणि रात्री विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन पाऊस कोसळेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी साडे बारा वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी समुद्रात ४.७१ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर दुसरी भरती ही मध्यरात्री एक वाजता असेल यावेळी साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button