breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Chagan Bhujabal : राज्यात शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवणार : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुका स्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, सहकार, वस्त्रोद्योग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्प्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळी संख्यादेखील वाढवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button