breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विकास वित्त संस्था उभारण्याचा केंद्राचा मानस! नितीन गडकरींचे सूचक वक्तव्य

नवी दिल्ली – विकास वित्त संस्था उभारण्याचा केंद्राचा मानस : देशातील पायाभूत सुविधांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवीन ‘विकास वित्त संस्था’ (डीएफआर) उभारण्याची योजना आखत असल्याचे सूचक वक्तव्य केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

२० हजार कोटी रूपयांचा भांडवली पाया असलेल्या या संस्थेकडून पुढील तीन वर्षात ५ लाख कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकार एकात्मिक जल,हवाई आणि रस्ते कनेव्हिटी मोठ्या प्रमाणात विकसित करीत असल्याचे देखील यावेळी गडकरी म्हणाले. भारतातल्या अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या नुकत्याच आयोजित २९ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला व्हिडिओ कॉन्फरिंगच्या माध्यमातून संबोधित करताना गडकरी बोलत होते.

विकास वित्त संस्था उभारण्याचा केंद्राचा मानस
जगातील दुसऱ्या क्रमांकावरील ६ दशलक्ष किलोमीटर रस्त्यांचे जाळे भारतात आहे. देशातील जवळपास ७०% माल वाहतूक आणि जवळपास ९०% प्रवासी वाहतूक रस्ते मार्गाने होते. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका असल्याने नवीन डीएफआर महत्वाची ठरणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन द्वारे केंद्र सरकार पायाभूत सुविधा विकासात १.४ ट्रिलीयन डॉलर्सची गुंतवणूक करीत आहे.देशातल्या समग्र आणि एकात्मिक विकासासाठी लवकरच १०० लाख कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या पंतप्रधान गतीशक्ती योजनेचा राष्ट्रीय आराखडा जाहीर करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.

हा आराखडा राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईनसाठी आरखडा पुरवणार असून लॉजिस्टिक खर्चात कपात करत, पुरवठा साखळीत सुधारणा करीत भारतीय उत्पादने अधिक स्पर्धात्मक करण्याचा यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणालेदेश इलेक्ट्रोनिक दुचाकी, तीन चाकी आणि गाड्या यासाठी मोठी इलेक्ट्रोनिक वाहन बाजारपेठ होत आहे.इलेक्ट्रोनिक बॅटरी तंत्रज्ञानासाठी अमेरिकी कंपन्या आपल्या संशोधन आणि विकास कंपन्यांशी सहकार्य करावे,अशी सूचना देखील त्यांनी यावेळी दिली.

२०२५ पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातला द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज अमेरिकी डॉलर्स वर पोहोचेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.येत्या पाच वर्षात ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा विकासाची महत्वाची भूमिका असल्याचे गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button