breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महानगपालिकेला केंद्र सरकारचा ‘गव्हर्नन्स’ पुरस्कार!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अॅपने भारत सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये ‘गव्हर्नन्स’ श्रेणीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. देशभरातील ८० पात्रताधारक शहरांमधून पिंपरी चिंचवडला ‘गव्हर्नन्स’ पुरस्कार जाहीर झाला असून २७ सप्टेंबर २०२३ रोजी इंदौर (मध्यप्रदेश) येथे होणा-या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले आहे. हे यश म्हणजे पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असेही सिंह म्हणाले.

हेही वाचा – ‘मी चॅलेंज देऊन सांगतो; अजित पवार मुख्यमंत्री..’; छत्रपती संभाजीराजे यांचं सूचक विधान

देशातील १०० स्मार्ट शहरांनी गतिशीलता, ऊर्जा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागा, सामाजिक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट गव्हर्नन्सचे विस्तृत प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांना प्रोस्ताहन देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत, इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट (आय.एस.ए.सी.)उपक्रम हाती घेतला आहे.

स्मार्ट सिटीज मिशन नाविन्यपूर्ण स्मार्ट सोल्यूशन्स द्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असून शहरी विकासात एक आदर्श बदल साध्य करण्याच्या ध्येयाकडे मिशनद्वारे महत्वापूर्ण टप्पे गाठले आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या मदतीने सहभागी प्रशासनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाबत आहे. सध्या सुमारे २ लाख ५० हजार वापरकर्ते अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत मासिक पोहोच सुमारे ५ ते ६ लक्ष आहे. पिंपरी चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने ही एक गौरवाची बाब आहे, असं आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button