Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

अंत्यसंस्कार सुरू असताना पेटत्या चितेवर कोसळलेले सिमेंटचे दहनशेड

यवतमाळः स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पेटत्या चितेवर दहनशेड कोसळले. मलब्याखाली दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे मंगळवारी घडली.

जमशेटपूर या गावातील मधुकर श्यामा आडे याचे ११ जुलै रोजी निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइक व गावकरी स्मशानभूमीत जमले होते. मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याठिकाणी असलेल्या सिमेंटच्या शेडखाली अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. नातेवाइकांनी शेडखाली चिता रचली. विधिवत सर्व पूजा झाल्यावर चिता पेटविण्यात आली. नातेवाईक झाडाखाली बसले असताना अचानक सिमेंटचे शेड खांबासह खाली कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

शेडच्या मलब्यात दबलेले पार्थिव बाहेर काढून पुन्हा चिता पेटविण्यात आली. तीन वर्षांपूर्वी जमशेटपूर येथील दहनशेड बांधण्यात आले होते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button