breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कस्तुरबासह शहरातील चार रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सतर्क

मुंबई | महाईन्यूज

करोनाच्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयासह शहरातील राजावाडी, वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातही विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. करोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना पालिकेने सुरू केल्या आहेत. मुंबईत आढळलेल्या करोना संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते आहे.

येथे सध्या २८ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील कस्तुरबा रुग्णालयांसह पालिकेच्या अन्य ४ रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी सुरू आहे. कस्तुरबामध्ये विलगीकरण कक्षामध्ये अजून १०० खाटांची निर्मिती करणे शक्य आहे. यासह अजून ५०० खाटा उपलब्ध करण्यासाठी राजावाडी, वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील जागा निश्चित केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे.

मास्क तुटवडय़ाबाबत काकाणी म्हणाले, ‘पालिका रुग्णालयात मास्क तुटवडा नाही. सध्या कस्तुरबा रुग्णालयात सुमारे चार हजार मास्कचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास मास्क आणि औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे अधिकारही रुग्णालयांना दिलेले आहेत.’ पूर्वतयारी म्हणून पालिकेने नवा आराखडा तयार केला आहे. खासगी रुग्णालयांत विलगीकरण कक्षासह उपचारांची सुविधा उपलब्ध करण्याचा पर्यायही पालिका धुंडाळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button