breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘राम मंदिर लोकार्पणाचा उत्सव साजरा करा’; मनसे प्रमुख राज ठाकरे

सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांचे मार्गदर्शन

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन केले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • कालपासून कणकण जाणवतेय, अशक्त वाटतंय… आज इथं येणं शक्य होणार नाही असं वाटत होतं पण महाराष्ट्रभरातून तुम्ही आलात तुमचंही दर्शन घेणं तितकंच महत्त्वाचं होतं म्हणून आज माझ्या सर्व विजयी सरपंचांना, ग्रामपंचायत सदस्यांना भेटण्यासाठी आलो.
  • तुम्ही राजकारणात पहिलं पाऊल टाकलंय याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तुमची हि राजकीय वाटचाल यशस्वी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त देतो.
  • आपल्या गावात काय करायचं ह्याबद्दल तुम्ही सुज्ञ आहात, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सहकारी उत्सुक असतात पण मला तुम्हाला एकंच सूचना करायची ते म्हणजे आपलं गाव सर्वांगाने स्वच्छ ठेवा.
  • १९८९ सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे, उभा महाराष्ट्र अनेकदा फिरलो पण एक दुरावस्था मला सतत जाणवली ती म्हणजे अस्वच्छ खेडी. त्या अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांची जगण्याची उर्मीच संपून जाते.

हेही वाचा  –  महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली? : राष्ट्रवादीशी पंगा पडा महंगा!

  • माझ्या ‘अस्थेटिक व्हिजन’च्या माहितीपटात पण मी एक विचार मांडला होता कि आपला परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही इच्छाशक्ती लागते.
  • आपलं भवताल स्वच्छ – सुंदर – समृद्ध तर आपलं मन मोठी स्वप्न पाहिलं आणि आपल्या गावात समृद्धी येईल.
  • आपली ग्रामीण तरुणाई शहरात यायला बघत आहे आणि शहरातील तरुणाई परदेशात जायला… तरुणाई हे स्थलांतर फक्त शिक्षण-नोकरीसाठी नव्हे तर शहरांमधलं वातावरण, तिथली जीवनपद्धती त्यांना खुणावते आहे. ह्यावर आपण विचार करायला हवा.
  • आपल्या गावात तरुणाईच्या मनात ऊर्जा निर्माण होईल असं वातावरण उभं करा.
  • माझ्या विजयी सरपंचांनो, पंचायत सदस्यांनो काम असं करा कि सर्वांना वाटलं पाहिजे उत्तम कारभार करावा तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माणसांसारखाच.
  • ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांच्यावर सूड उगवू नका, कारभार करताना कुणाविषयी असूया ठेवू नका एक उमदं वातावरण उभं करा. विश्वासाने सांगतो लोकं आपल्यामागे उभी राहतील.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वांगाने स्वच्छता आणि उत्तम कारभार करणाऱ्या सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला मी स्वतः ५ लाखाचं बक्षीस जाहीर करतो.
  • येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमीवर राममंदिराचा शिलान्यास होणार आहे… बलिदान झालेल्या, लढलेल्या असंख्य करसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय… महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा… पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button