breaking-newsराष्ट्रिय

CCD च्या हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे (सीसीडी) मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. मंगळुरू पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सिद्धार्थ यांचा शोध सुरु असतानाच शेअर बाजारामध्ये सीसीडीचे शेअर्स २० टक्यांनी पडले आहेत. मात्र आता सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर ‘सीसीडी’चे काय होणार?, कंपनी बंद पडून कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

  • सीसीडीचा डोलारा

सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून ३० हजार रोजगारांची निर्मिती झाल्याचे म्हटले आहे. ज्या सीसीडी ब्रॅण्डमुळे सिद्धार्थ ओळखले जातात त्या सीसीडीमध्ये आज पाच हजारहून अधिक जण प्रत्यक्षपणे कामाला आहेत.

सीसीडीची वार्षिक उलाढाल ४ हाजार ३३१ कोटींहून (६८.९ मिलियन डॉलर) अधिक आहे. चिकमंगळुरुमध्ये सीसीडीच्या नावाने २० हजार एकरची जमीन आहे. यामध्ये अॅरेबिका या कॉफीच्या बियांची लागवड केली जाते. ही कॉफी अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये निर्यात केली जाते. १९९६ साली सीसीडीचे पहिले रेस्टॉरंट सुरु झाले. ११ जुलै १९९६ रोजी बंगळुरुमधील ब्रिज रोडवर सीसीडीची पहिली शाखा सुरु करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत भारतातील २८ राज्यांमध्ये ‘सीसीडी’च्या १ हजार ७७२ शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. भारताबरोबरच ऑस्ट्रीया (व्हिएन्ना), चेक प्रजासत्ताक, मलेशिया, इजिप्त आणि नेपाळमध्येही ‘सीसीडी’च्या शाखा आहेत.

२०१० मध्ये अमेरिकेतील कार्लबर्ग कार्व्हीस रॉबोर्टस या कंपनीने सीसीडीमध्ये एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच वर्षी कंपनीने त्यांचा लोगो बदलून आताचा लोगो वापरण्यास सरुवात केली. २०१० मध्येचे ‘सीसीडी’ने चेक प्रजासत्ताकमधील कॅफे इम्पीरीओ ही कंपनी विकत घेतली. चेक प्रजासत्ताक कॅफे इम्पीरीओच्या ११ शाखा असून पोर्तूगालमध्ये ७ तर ब्रुनोमध्ये १ शाखा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button