breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CBSE बोर्डाने शाळांना ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी VH Softwares अ‍ॅप विकत घेण्यासाठी आदेश दिल्याची अफवा

सोशल मीडियावर सध्या सीबीएसई बोर्डाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना संकटामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेबाबतचा संभ्रम वाढत चालला आहे.

सध्या सीबीएसई बोर्डाने शाळांना ऑनलाईन परीक्षा घेण्याअसाठी VH Softwares चं अ‍ॅप विकसित करून विकत घेत असल्याचं तसेच Officer on Special Duty यासाठी नेमणूक होणार असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. e-Pariksha Online Examination चे बोर्डाकडून टेस्टिंग करण्यात आले असून ऑडिओ-व्हिज्युअल मूव्हमेंटद्वारा चिटिंग होणार नाही याची खात्री करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत असलेल्या या खोट्या मेसेजमध्ये VH Softwares कडून अ‍ॅप बनवण्यात आलं असुन डॉ. साहिल गेहलोत यांची OSD म्हणून नेमणूक झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र पीआयबीने अधिकृत ट्वीटर हॅनडलवरून हा दावा फेटाळून लावला आहे.

यंदा एप्रिल महिन्यामध्ये सीबीएसई बोर्डाला पास करण्याच्या, पेपर तपासण्याच्या नव्या पद्धतीबाबतचे अशाप्रकारे खोटे मेसेज व्हायरल केल्याचं समजलं होतं. दरम्यान बोर्डानं अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सोशलमीडियावरील अधिकृत हॅन्डल्सवरून दिल्या जाणार्‍या माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डाने 10वी, 12 वीच्या उर्वरित परीक्षांसाठीचे वेळापत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जुलै महिन्यात 15 तारखेपर्यंत उर्वरित परीक्षा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button