breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

त्वचा नितळ, सुंदर,डागविरहित असण्यासाठी कोरफड जेल अत्यंत उपयुक्त

त्वचा नितळ, सुंदर आणि डागविरहित असण्यासाठी कोरफड जेल हे अत्यंत उपयुक्त आहे. हे जल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक आहे. त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये हर्बल आणि औषधी गुणधर्मांचा साठा आहे. ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. अ‍ॅलोव्हेरा जेल आपल्या त्वचेसाठी कसे लाभदायक ठरते हे जाणून घेऊया.

चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावण्याचे फायदे

कित्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनांप्रमाणेच कोरफडचा रस देखील चेहऱ्यासाठी लाभदायक आहे. या औषधी वनस्पतीमध्ये ७५ प्रकारचे घटक असतात. ज्यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो

​कसा करावा कोरफड जेलचा वापर

केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे होणारे दुष्परिणाम पाहता प्रत्येक जण आता आयुर्वेदिक, हर्बल उपचार करण्यावर भर देत आहेत. नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला दीर्घ काळासाठी फायदे मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणामही होत नाहीत. कशा पद्धतीने कोरफड जेलचा त्वचेसाठी वापर करावा, जाणून घेऊया काही नैसर्गिक उपायांची माहिती.

​​कोरफड आणि काकडी

काकडी व कोरफड एकत्र करून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास लावा. कोरफड जेल आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने काकडी – कोरफडचा रस बाउलमध्ये गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेलासह देखील कोरफड जेल मिक्स करू शकता. नियमित हे उपाय केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

​अ‍ॅलोव्हेरा फेस स्क्रब

कोरफड जेल आणि ग्राउंड ओटमील एकत्र घ्या. जाडसर मिश्रण तयार करा. नियमित या स्क्रबचा वापर करावा. ओटमील आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचं कार्य करते. तर कोरफडमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

चेहऱ्यासाठी अ‍ॅलोव्हेरा लेप

तुमच्या घरामध्ये कोरफडचे रोपटे असेल तर त्यातील ताजा गर काढून घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हेअर पॅक म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.

कोरफड जेल रात्रभर चेहऱ्याला लावण्याचे फायदे

आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलनं मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेला लाभ मिळतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button