breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!

औरंगाबाद – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट के लं आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर

श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील. तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल. औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती, अशी टीका श्वेता महाले यांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button