breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणात केलेल्या फळबागांच्या वाढीव मदतीपासून नांदेडच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीपर्यंतच्या निर्णयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली होती.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या सुपारी, नारळ या फळ झाडांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नांदेड महापौर, उपमहापौर निवडणूक आणखी 3 महिने पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच पीक पाणी परिस्थितीविषयी देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीला आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील 121 मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी देणार आहोत. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रम शिकण्यासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या योजनेतून प्रोत्साहन देखील मिळेल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button