Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी; मुंबईसह अन्य प्रमुख शहरांमधील नोकऱ्यांमध्ये जवळपास २३ टक्के वाढ

मुंबईः देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईसह अन्य प्रमुख शहरांमधील नोकऱ्यांमध्ये जवळपास २३ टक्के वाढ झाली आहे. प्रामुख्याने बँकिंग व वित्तक्षेत्रात ही वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ‘मॉन्स्टर’ संस्थेने याबाबत सर्वेक्षण केले असून त्याआधारे त्यांनी कर्मचारी निर्देशांक तयार केला आहे. त्यानुसार संपूर्ण देशात नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीत तीन टक्के वाढ झाली आहे. करोना लॉकडाउनदरम्यान सर्वत्र अनिश्चितता असताना नवीन कर्मचारीभरतीत दोन टक्क्यांची घट झाली होती. परंतु भारतात त्याचवेळी तीन टक्क्यांची वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.

एकूण १३ पैकी १० शहरांनी जून २०२२ मध्ये सकारात्मक नोकरीची मागणी दर्शविली, ज्यामध्ये मुंबई २३ टक्क्यांसह अग्रस्थानी आहे. कोईम्बतूर १९ टक्क्यांसह द्वितीय श्रेणी शहरांत अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ हैदराबादमध्ये १५ टक्के, दिल्ली-एनसीआरमध्ये १३ टक्के, अहमदाबादमध्ये ११ टक्के, पुण्यात ९ टक्के तर चेन्नईत आठ टक्के वाढ नोंदली गेली.भारतातील या वाढीचे प्रमुख कारण बँकिंग व वित्तक्षेत्रासह रसायन, खते, पर्यटनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वाढ, हे आहे. या क्षेत्राने रोजगाराच चांगला कल दर्शवला. त्यामुळेच बँकिंग व वित्तक्षेत्रात २८ टक्क्यांची वाढ झाली. या २८ टक्के वाढीत मुंबईचा हिस्सा अधिक आहे.

या व्यतिरिक्त, रसायने, प्लास्टिक, रबर, पेंट्स, खते-कीटकनाशके या क्षेत्रातदेखील २४ टक्क्यांनी नवीन नोकऱ्या वाढल्या. २०२५पर्यंत ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्‍याचे अनुमान असलेल्या या क्षेत्राने औद्योगिक उत्पादनात तंत्रज्ञानात नवनवीन बदल आणले. त्यामुळे कौशल्य आणि अनुभवाच्या विस्तृत श्रेणीची मागणी वाढली आहे. शिवाय, प्रवास आणि पर्यटनक्षेत्र करोना निर्बंधमुक्त झाल्याने त्या क्षेत्रातील मागणी २५ टक्क्यांनी वाढली आहे, असेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.

आयटी क्षेत्रात मात्र घट
दुसरीकडे, आयटी-हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रात नवीन नोकऱ्यांमध्ये दोन टक्के घट झाली. प्रसारमाध्यमे व मनोरंज क्षेत्रातदेखील २६ टक्के तर, अभियांत्रिकी, सीमेंट, बांधकाम, लोह-पोलाद क्षेत्रात २० टक्के, जहाज-समुद्री क्षेत्रात १० टक्के, जैवतंत्रज्ञान; औषधी व शिक्षण क्षेत्रात ४ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button