breaking-newsपुणेमहाराष्ट्र

संघर्ष! भीम आर्मी दत्ता पोळ यांच्या नेतृत्वात पुणे ते मुंबई मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवास्थानावर भीम संघर्ष मार्च !

प्रतिनिधी |

पुणे | मुख्यमंत्री साहेब आम्ही येतोय ! ही टेग लाईन असलेला भीम संघर्ष मार्च पुणे ते मुंबई निघणार आहे.भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दत्ता पोळ या मार्च चे नेतृत्व करणार आहे. राज्यातील दलित आदिवासी च्या विविध गंभीर प्रश्नांवर ३ ते 7 सप्टेंबर, २०२० या दरम्यान पुणे ते मुंबई असा भीम संघर्ष पायदळ मार्च निघणार आहे. यात मोठ्या संखेने दलित आदिवासी बांधवांनी सहभागी होण्याचे आव्हान पोळ यांनी पत्रकार परिषदेत केलेले आहे.

या मार्चचा मुख्य उद्देश राज्यात दलित आदिवासी वरील वाढते अत्याचार, दलित अत्याचार ग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनास विलंब, हजारो दलित आदिवासी अत्याचाराच्या केसेस न्यायालयात प्रलंबित आणी सरकारची उदासीनता, दलित आदिवासी ६७ % टक्के कल्याण निधी चे वर्गीकरण, राज्गृहावरील हल्याचे मुख्य सूत्रधार अजूनही अटक नाही, खाजगी क्षेत्रात आरक्षण इत्यादी मुख्य मागण्या असल्याचे भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्र चे दत्ता पोळ यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे.

पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा अध्यक्ष नीता अडसुळे, प्रदीप कांबळे आणी संगठ्नेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ३ सप्टेंबर ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे इथून हा संघर्ष मार्च दुपारी निघणार आहे.मुख्य अतिथी म्हणून माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, जाती अंताची लढाई या संगठ्नेचे डॉक्टर संजय दाभाडे आणी इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहून मार्च चा प्रारंभ करणार आहे. हा मार्च देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पनवेल, नवी मुंबई, चेंबूर असा प्रवास राहणार आहे. या मार्च मध्ये साधारण 5 ते ६ हजार भीम सैनिक सहभागी होणार असल्याचे दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे.

मार्च 7 सप्टेंबर ला मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवास्थानी धडकणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दलित आदिवासी च्या प्रश्नावरील विविध मागण्याचे निवेदन देऊन गांभीर्याने अंमलबजावणी करण्यास भाग पाडू असे पोळ म्हणालेले आहेत.
पायदळ मार्च ने विशेष आकर्षण म्हणजे राज्यातील दलित आदिवासी अत्याचाराच्या घटनांची दाहकता असलेला एक भीम रथ तयार करण्यात आलेला असून या माध्यमातून राज्यातील दलित आदिवासी अत्याचार गांभीर्य सरकारच्या निदर्शनात लक्षात आणून देऊ असे पोळ म्हणालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button