TOP Newsताज्या घडामोडीपुणे

छापील वीजदेयक बंद करून पुणेकरांचा पर्यावरणास हातभार

पुणे : महावितरणकडून देण्यात येणारे छापील वीजदेयक बंद करून केवळ ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून देयकाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस पुण्यात वाढत आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ या उपक्रमात एकूण ८९ हजार पुणेकर वीज. ग्राहक सहभागी झाले असून, पर्यावरणाच्या रक्षणात ते खारीचा वाटा उचलत आहेत. गेल्या सहा महिन्यांत १४ हजार १४० ग्राहकांनी नव्याने या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजदेयकाच्या कागदाऐवजी केवळ ई-मेल, एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रत्येक देयकात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजदेयक तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. एसएमएसद्वारे देयकाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे मुदतीत देयक भरल्याच्या योजनेला लाभही ग्राहकाला घेता येतो.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील ४७ हजार ५७४ तर पिंपरी-चिंचवड शहरातील २६ हजार ११७ तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे आणि हवेली तालुक्यामध्ये १५ हजार २३४ ग्राहकांनी वीजदेयकांसाठी छापील कागदाऐवजी ई-मेल, एसएमएसला पसंती देत पर्यावरणपूरक योजनेत सहभाग घेतला आहे. महावितरणची ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजदेयकांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

योजनेस सहभागी होण्यासाठी…

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजदेयकावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती http://www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मूळ स्वरूपातील देयक उपलब्ध

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजदेयकांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजदेयक संगणकात जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजदेयकांसह एकूण १२ महिन्यांचे वीज देयक मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button