breaking-newsपुणे

तीन लाख रुपये किमतीचे 59 किलो रक्‍तचंदन जप्त

पुणे- एका ह्युंदाई कारमधून 59 किलो वजनाचे रक्तचंदन गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून हस्तगत करण्यात आले. याची किंमत सुमारे 3 लाख 60 हजार इतकी होती. पोलिसांनी ह्यंदाई कारसह 5 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर याप्रकरणी कारचालक राहुल हरिदास इंगळे (30, रा. भुगाव, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्द कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. युनिट एकचे नितीन भोसले पाटील यांनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button