Pimpri-Chinchwad । चंदूकाका सराफ ज्वेल्सचे दालन आता आपल्या चऱ्होलीत!
शोरुम उद्घाटनासाठी धमाका ऑफर्स : ३ स्कूटर, ३ मोबाईल, ३ लॅपटॉप जिंकण्याची सुवर्णसंधी
पिंपरी- चिंचवड : हार्ट ऑफ सिटी असणाऱ्या चऱ्होलीमध्ये चंदूकाका सराफ ज्वेल्सचे नवे दालन सुरू होणार आहे. या नव्या दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांना धमक ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
चऱ्होलीमध्ये ड्रीम्स कार्निवल प्लॅटिनम बिल्डिंग पुणे आळंदी रोड, येथे 3 जानेवारी 2025 रोजी या नव्या दालनाचे उद्घाटन होणार असून, उद्घाटनाच्या निमित्ताने खरेदीवर ग्राहकांना ३ स्कूटर, ३ मोबाईल, ३ लॅपटॉप जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याशिवाय 19 हजार रुपयांपुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू आणि 5 हजारहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.
गेली अनेक वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येक ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नांव म्हणजे चंदुकाका सराफ ज्वेलर्स! चंदुकाका सराफ ज्वेलर्सने शुध्द सोने ही संकल्पना घराघरात पोहचवली. संपुर्ण महाराष्ट्रभर विश्वास संपादित केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांच्या सुवर्णपेढीच्या नव्या दालनाचे उद्घाटन चऱ्होलीमध्ये होत आहे.






