TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण

पिंपरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याअंतर्गत आणि खासदार स्थानिक विकास निधीतून तीर्थक्षेत्र देहूगाव परिसरामध्ये विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे. तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांचे शुभहस्ते रविवारी (दि.1) झाले. तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी देहूकरांना दिली.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्यपहार अर्पण करून झाली. देहू हद्दीतील समर्थनगर, देहूगाव जुनपालखी मार्ग, ओंकार सोसायटी, भैरवनाथ नगर, व्यंकटेश सोसायटी, शिवनगरी सोसायटी, राजमाता जिजाऊ सोसायटी, गंधर्व विहार सोसायटी, विठ्ठलनगर येथील राजमुद्रा सोसायटी व श्री विघ्नहर्ता सोसायटी येथील अंतर्गत रस्त्यांच काँक्रीटी करणाचे भूमीपूजन झाले. त्याचबरोबर माळीनगर येथील सभामंडपाचे, शिवनगरी येथील पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण झाले. देहू परिसरात चार हायमास्ट दिवे खासदार निधीमधून देण्यात आले. त्याचेही भूमीपूजन करण्यात आले.

देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शीतल हगवणे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उप जिल्हाप्रमुख शरद हुलावळे, नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण समिती सभापती सपना मोरे, नगरसेविका ज्योती टिळेकर, पुजा काळोखे, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, संघटक सुनील मोरे, माजी जिल्हापरिषद सदस्य माऊली काळोखे, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव साकोरे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, उद्योजक मिलिंद अच्युत, रविंद्र ब्रम्हे उपस्थित होते.

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना देहूशहर शाखा बोर्डचे उद्धघाटन खासदार बारणे व पदाधिकाऱ्यांचे शुभहस्ते करण्यात आले. नगरविकास विभाग, खासदार बारणे यांच्यामाध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने देहूकरांनी समाधान व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही – खासदार बारणे

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”तीर्थक्षेत्र देहूगावमध्ये राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. देहूचा परिसर झपाट्याने वाढत आहे. नव्याने देहू नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. त्यामुळे विकास निधीचा कमतरता आहे. नागरिकांना, येणा-या भाविकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधीची टंचाई जाणवते. नागरिकांना सोई-सुविधा मिळाव्यात यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करुन निधी मिळविला. नगरविकास आणि स्थानिक खासदार निधीतून तीन कोटी रुपयांची कामे सुरु केली. नागरिकांच्या मागणीनुसार सिमेंट काँक्रींटचे अंतर्गत रस्ते केले जाणार आहेत. त्याचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार निधीतून उभा राहिलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देहूच्या विकासासाठी सातत्याने निधी देतात. खासदार निधीही देहूच्या विकासासाठी खर्च केला जात आहे. तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही”.

विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमाच्या पुढाकारात शिवसेना देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, भाजप देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, शुभंगी काळगे, उपशहरप्रमुख संजय आहेरकर, संदीप हगवणे, संतोष हगवणे, नारायण पाचपिंड, कार्याध्यक्ष रायबा मोरे,प्रविण कांबळे, गौतम हटाळे, जितेंद्र बाणेकर, संदीप परंडवाल, राजेश टिळेकर, नारायण काळोखे, सुनिल धुमाळ, विजय निम्हण, अजय गुजर, मिलिंद जाधव, दिपक नवले, मयूर देवकर,चंद्रकांत जाधव, मंगेश हगवणे, सचिन हगवणे, विनोद हगवणे, चेतन हगवणे, विनोद टिळेकर, सागर हगवणे, प्रविण हगवणे, गणेश परंडवाल, बाळासाहेब टिळेकर, गणेश खंडागळे, निलेश गोरे, मंगेश लोणकर, गोविंद टिळेकर, प्रकाश टिळेकर, गोरख टिळेकर, काळू शिंदे आदीजण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश खंडागळे यांनी केले, तर संजय आहेरकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button