breaking-newsटेक -तंत्र

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन, 90 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज मिळणार 5 जीबी डेटा

मुंबई : भारतात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरात बसून आहेत. तर काही लोकं घरातून वर्क फ्रॉम होम करत आहेत. या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेडने (बीएलएनएल) युझर्ससाठी नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये कंपनी ग्राहकाला 90 दिवस दररोज 5 जीबी डेटा देणार आहे.

बीएसएनएल कंपनी 599 रुपयांचे प्रीपेड एसटीव्ही घेऊन आले आहे आणि या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकाला दररोज 5 जीबीचा डेटा दिला जाणार आहे. कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युझर्स देशात कुठेही करु शकतो. संपूर्ण देशभरात हा प्लॅन उपलब्ध आहे.

बीएसएनएलच्या नव्या 599 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांची आहे. त्यासोबत यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसही दिले जाणार आहे.

यापूर्वीही बीएसएनएलने 551 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. पण त्या प्लॅनचा फायदा केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील युझर्सला मिळत होता.

अनलिमिटेड फ्री कॉलिंग

यापूर्वीचा 551 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जात होता. पण आता 599 रुपयाचा नवा प्लॅन एसटीव्हीला अनलिमिटेड कॉम्बो प्लॅन म्हणून घोषित केले आहे. या प्लॅनच्या माध्यमातून देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा पर्याय दिला आहे. यामध्ये दररोज 250 मिनिट युझर्सला मिळणार आहे. याशिवाय 5 जीबी हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसही ऑफर केले जात आहे.

एकूण 450 जीबी हाय स्पीड डेटा

बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनच्या मदतीने देशभरातील सर्व सर्कल्समध्ये रिचार्ज केला जाऊ शकतो. 5 जीबी हायस्पीड डेटा संपल्यानंतर स्पीडमध्ये घट होऊन 80 केबीपीएस राहणार. त्यामुळे या प्लॅनला वर्क फ्रॉम होम म्हटले आहे कारण यामध्ये खूप डेटा दिला आहे. 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये 450 डेटा ग्राहकाला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button