breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागितल्या प्रकारे दोघांवर गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली तीन कोटी रूपयांची खंडणी

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांकडून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजेश व्यास यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर ‘कॉल मी’ नावाचे एक अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात भाजप प्रदेश सरचिटणीसमुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या अ‍ॅप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचा नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचा गैरवापर केला.

या दोघांनी मोहोळ यांच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत, असं व्यावसायिकाला सांगितले. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकांने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ शोध घेत दोन आरोपींना अटक केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button