breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: अमेरिकेच्या सीमा जगासाठी तात्पुरत्या बंद; ट्रम्प यांचा निर्णय

करोना विषाणूचा जबरदस्त फटका बसलेला अमेरिका आता कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर तात्पुरती बंदी घालण्याच्या तयारीत आहे. “अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार” असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

“अदृश्य शत्रूकडून झालेल्या हल्ल्यामुळे आमच्या महान अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेता, मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करेन!” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा तपशील अद्याप मिळालेला नाही. तसेच, त्या आदेशावर कधी स्वाक्षरी करणार याबाबतही ट्रम्प यांनी काही माहिती दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button